पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रोहिदास शिखर परिक्रमा , माकडनाळ मार्गे...

इमेज
भाग दुसरा ... दिनांक - २८ नोव्हेम्बर २०२० , शनिवार . बेलपाड्यात पोहचता पोहचता सकाळचे ७ वाजून गेले होते . नाशिक पासून अवघ्या १३० की मी. अंतरासाठी आम्हाला तब्बल ९ तास लागले होते. अवघड ट्रेकची अशी अवघड सुरुवात होईल हे कोणाच्या ध्यानी मनी नव्हते. तरीही आमचा ट्रेक होऊ शकेल हाच आनंद मोठा होता.  सूर्य देवता तारामती शिखराच्या आडून वर येऊ पाहत होती. बेलपाडा हे गाव कोकणकड्याच्या अगदी समोर पश्चिमेला वसलेले आहे. त्यामुळे  सूर्य दर्शन येथे नेहमी उशीरा होत असते. कोकणकड्याचे दर्शन येथून खूपच विलोभनीय होते. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर  पांढरे ढग पिंजून पसरलेले होते. लांबच लांब  व  उंचच उंच पसरलेला हरिश्चंद्र गड छाती दडपून टाकत होता.   आम्ही २३ जण गावात पोहचलो. नैसर्गिक विधी आटोपुन चहा , नाश्ता करून कोकणकड्याच्या दिशेने चालू लागलो. शेत, जंगल तुडवत जाणारा रस्ता पुढे ओढ्याला जाऊन मिळतो . पावसाळ्यात हा ओढा दुधडी भरून वाहतो . तेव्हा या वाटेने जायचे धाडस कोणी करत नाही. ओढा आत्ता कोरडा झाला होता मात्र काही ठिकाणी पाणी साचलेले दिसत होते. या नितळ पाण्यात छोटे मासे मस्त विहार करत...

रोहिदास शिखर परिक्रमा , माकडनाळ मार्गे...

इमेज
पहाटे बेलपाड्याकडे जाताना Add caption सकाळी बेलपाड्यातून दिसणारा हरिश्चंद्र गड भाग पहिला ... बऱ्याच दिवसापासून गड किल्ले , फोटोग्राफी , सायकलिंग साठी भटकंती होत असते. खूप साऱ्या गोष्टी मनाला भावतात त्या शब्द रुपात ब्लॉगमध्ये उतरल्या तर चिरकाल लक्षात राहतील . या हेतूने व बऱ्याच जवळच्या मित्रांनी आग्रह केल्या मुळे ब्लॉग चे लिखाण सुरू करत आहे. नुकताच २८ व २९ नोव्हेंबर २०२० रोजी रोहिदास शिखर परिक्रमा ट्रेक पूर्ण केला. त्या ट्रेकच्या दरम्यान घडलेले प्रसंग , फोटो या ब्लॉग मध्ये मी लिहीत आहे.  ट्रेकर लोकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. नाशिककरांना राजूर , पाचनई मार्गे सोपा आणि सोईस्कर आहे. त्याशिवाय टोलरखिंड, खिरेश्वर मार्ग मुंबई , पुणे कर जास्त वापरतात.  हे मार्ग पाहून झाले की ट्रेकर लोकांना नळीची वाट , माकड नाळ हे अवघड, रोमांचकारी मार्ग खुणावू लागतात. मागच्या वर्षी आम्ही एकाच दिवसात नळीच्या वाटेने चढाई करून कोकणकडा फेर फटका मारून बैल घाट व साधले घाट मार्गे ट्रेक पूर्ण केला होता. पहाटे पाच वाजता चालू केलेला ट्रेक संध्याकाळी १०=३० वाजता संपल...